विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा,दि. २० जुलै:- भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर तालुक्यात धान रोवणी करीता दुसऱ्याच्या शेतात ट्रँक्टरने चिखल करीत असतांना ट्रँक्टर फसला अन् बाहेर काढण्याच्या प्रयत्नात अचानकपणे ट्रँक्टर ने पलटी घेतली व चालक ट्रँक्टर खाली दबल्ये गेल्याने, त्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना . मडेघाट शेतशिवारात घडली आहे. संदीप आनंदराव ढोरे (२५) रा. कन्हाळगाव, ता. लाखांदुर, जि. भंडारा असे मृतक ट्रँक्टर चालकाचे नाव आहे.
सविस्तर असे की, मृतक संदीप हा गत काही दिवसांपासून गावातीलच मनोहर बेदरे यांच्या ट्रँक्टरवर चालक म्हणून काम करीत होता. दरम्यान लाखांदुर येथील नरेंद्र महादेव राऊत यांची शेत जमिन मडेघाट – कन्हाळगावच्या शेत शिवारात असून, त्या जागेत मृतक ट्रँक्टर चालक हा आपला सहकारी जगदिश ढोरे यांच्यासह दोन ट्रँक्टरने चिखल करीत असतांना, अचानकपणे ट्रँक्टर फसला गेल्याने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत असतांना ट्रँक्टरने पलटी घेतली. सदर बाब त्याचा सहकारी जगदिश ढोरे व जमिन मालकाच्या लक्षात येताच त्यांनी पलटी घेतलेल्या ट्रँक्टर कडे धाव घेतली व बचाव कार्य करून पाहिले. माञ चालक ट्रँक्टर खाली दबला गेला असल्यामुळें त्याला बाहेर निघता आले नाही. तर चिखलात गुदमरून त्याचा मृत्यु झाला. घटनेची माहिती गावात वा-यासारखी पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. मृतक संदीपच्या पश्चात पत्नी सपना, एक मुलगी, आई, वडील असा आप्त परीवार आहे. लाखांदुर पोलीसांनी घटनास्थळ गाठून अन्य ट्रँक्टरांच्या मदतीने पलटी झालेला ट्रँक्टर सरळ केला व मृतकास बाहेर काढून पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी लाखांदुर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पुढील तपास ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल कोकाटे करीत आहेत.