विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी परंडा
शेळगाव:- दिनांक 20/07/2021 मंगळवार शेळगाव शाखेचा 4 था वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शेळगावचे सरपंच विष्णु (नाना)शेवाळे, उपसरपंच राजेंद्र जगताप, ग्रा.सदस्य विलास दैन, ग्रा.सदस्य शहाजी मगर,माझी सरपंच बिभीषण दैन,बाबुराव दैन, अनिल गायकवाड,सुशांत काळे,बंडू शेवाळे,विलास मोरे, बाळू यादव.ज्ञानेश्वर दुरगुळे,भालबा दैन,धनंजय दैन, योगेश काळे,अण्णा मगर , हुनुमंत मगर,अशोक थोरात,योगेश देशमुख, उपस्तिथ होते.
यावेळी सर्व उपस्थितांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून सर्व उपस्थितांचे स्वागत केले व संस्थे बद्दल माहिती दिली.संस्थेच्या QR code चे लोंचीग करून त्या विषयी माहीती देण्यात आली व त्यांना त्यांच्या खात्यांचे QR काढून दिले,त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले व त्यानंतर चहा पानाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी संस्थेचे मुख्य लेखापरीक्षक महेश मोहळकर, तालुका विकसक महेंद्र खेत्रे,शाखाधिकारी शत्रुघुन कोल्हे, कॅशियर लक्ष्मण मगर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सर्व मान्यवरांनी ज्योतिक्रांती संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.