विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि.२३ जुलै :- प्रहार संघटनेच्या वतीने रक्तदान करून एसटीचे पूजन करत राज्य परिवहन मंडळाच्या कार्यालयावर गांधीगिरी आंदोलन करण्यात आले. सविस्तर वृत असे की, २०१९- २० ला चालक यांची भरती घेण्यात आली. त्यांना प्रशिक्षण पण देण्यात आले. परंतु कोविड मुळे त्यांना रुजू करण्यात आले नव्हते आणि वारंवार वाहतुक नियंत्रक यांच्याकडून खोटे आश्वासन देण्यात येत होते. परंतु प्रहारचे जिल्हा प्रमुख यांच्याकडे जेव्हा ७४ चालक आले आणि त्यांनी आपले दुःख सांगितले की, आम्हाला खाजगी गाड्यावर पण कोणी काम देत नाही आणि एसटी विभाग पण रुजू करत नाही तेव्हा कोणताही विलंब न करता आपण आंदोलनाच्या भूमिकेत जाऊ व आपला हक्क मांगु अशी भूमिका घेत प्रहारच्या कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. नंतर एसटी स्टँड वर जाऊन एसटीचे पूजन केले व विभागीय कार्यालय येथे मोर्चा वळविला तेव्हा विभागिय अधिकारी वि. टी. गव्हाळे पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन कर्त्याच्या भेटायला आले. सकारात्मक चर्चा करत मुंबईच्या अधिकाऱ्यांसोबत दूरध्वनीवरून चर्चा केली व माझ्याकडुन सर्व कार्यवाही झालेली आहे. फक्त मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथुन पत्र आले की, आपल्याला रुजू करणार त्यासाठी १ महिण्याच्या आत कार्यवाही होईल व १०० टक्के रुजू करणार असे आश्वासन विभागिय अधिकारी वि. टी. गव्हाळे यांनी दिले. त्यावेळी पोलिस बंदोबस्त होता. मोर्च्याचे नेतृत्व प्रहारचे जिल्हा प्रमुख अंकुश वंजारी यांनी केले. तालुका प्रमुख जितू मेश्राम, शहर प्रमुख कृणल शहारे, चालक सुभाष शिवणकर, उमेश वाढई, राजेंद्र भुते, योगेश निखाडे, अंकुश मेश्राम इत्यादी कार्यकर्ते तसेच पदाधिका-यांनी सहकार्य केले.