अशोक इंगळे
शहर प्रतिनिधी लोणार
आज दिनांक 26 जुलै राज्य शिक्षक सेना परिवार बुलढाणा तालुका शाखा लोणार आयोजित कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षलागवड प्रेरणा पंधरवडा साजरा करण्यात येत असून त्या अंतर्गत आज गट साधन केंद्र लोणारच्या आवारामध्ये ता. अध्यक्ष रामप्रसाद कायंदे सर यांच्या मार्गदर्शनात वृक्ष लागवड मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावेळी पंचायत समिती लोणार चे माननीय गटशिक्षणाधिकारी श्री प्रकाश मापारी साहेब ,शिक्षक सेना जिल्हा सहसचिव दिपक चव्हाण सर,ता.संपर्क प्रमुख संतोष मुंढे सर, सरचिटणीस शिवाजी मुसळे सर, कार्याध्यक्ष नागेश वारे सर, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरदिवे सर सरदार शहा सर, संतोष आ मुंढे सर,कोशाध्यक्ष . विठ्ठल घायाळ सर, सचिव तुरूकमाणे सर चोपडे सर ,गटसाधन केंद्रातील शिक्षक. शिवा वऱ्हाडे सर, प्रकाश घायाळ सर, कदम सर, डव्हले सर ,जाधव सर कायंदे सर, गरकळ सर,बहिकरे सर, अवसरमोल दादा, अण्णा यांची उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.