संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
नवेगावबांध दि.28 जुलै:-शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 27 जुलै रोज मंगळवार ला सडक-अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. सध्या राज्यात काही ठिकाणी पुराची भयावह स्थिती असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार कोणत्याही प्रकारचा अवाजवी खर्च न करता किंवा बॅनर पोस्टर न लावता अतिशय साध्या पद्धतीने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून वाढदिवस साजरे करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख मनोज रामटेके, सचिन फुंडे, महेंद्र वंजारी, अश्लेष माडे, बबन बडोले, सतीश गहाणे तसेच तालुक्यातील इतर शिवसैनिक उपस्थित होते.

