राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी,नागभिड
नागभिड(29जूलै) पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण करणे सध्या गरजेचा आहे हा उद्देश ठेवून कोहळी समाज संघटना, नागभीड च्या वतीने तळोधी येथे दि. २६ जुलै २०२१ ला वृक्षारोपण करण्यात आले. कोहळी समाज संघटनेच्या वतीने तालुका नागभीड चे अध्यक्ष सुखदेव भाकरे, सचिव तुकाराम सोनवाणे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी प्रभू मस्के, प्रा दैवत बोरकर, प्रमोद गायकवाड,महेश काशिवार,भुपेश भाकरे आदींची उपस्थिती होती.