अकोला प्रतिनिधी संदिप सोनोने
लहूगर्जना मित्र मंडळ द्वारा आयोजित साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज 1 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील तरुणांनी रक्तदान करून अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली वाहिली. मासा सिसा उदेगाव येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर येथे सकाळी ११ ते दुपारी 3 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला. बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यानी रक्तदान करण्यास पुढाकार घेतला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सतिश फाले, उपसरपंच शंकर स्वर्गीव, क्रन्तीसेना अध्यक्ष गजानन तायडे, पंचायत समिती सदस्य विजय बाभुळकर,पुंजाजी स्वर्गीव, रवि तायडे आणि लहू गर्जना मित्र मंडळातील सर्व सदस्य हजर होते. लहू गर्जना मित्र मंडळाचे रवि तायडे, प्रमोद सरकटे, संतोष स्वर्गीव, आकाश चव्हाण, बंडू भाऊ गवई, अमन रायकर, गजानन स्वर्गीव, अमोल स्वर्गीव, पंकज वानखडे , गजानन धाकतोडे , योगेश फाले यांनी रक्त दान केले. हेडगेवार रक्तपेढी चे डॉ. संदीप देशपांडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.