बबन हेमने
तालुका प्रतिनिधी साकोली
साकोली,दि.१ ऑगस्ट:- मैत्रि दिवसाचे औचित्य साधून आज दि .१ ऑगस्ट रोजी साकोली या तालुक्याच्या ठिकाणी फ्रीडम टॅलेंट अकॅडमी व वनविभाग साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने साकोलीला लागून असलेल्या गडकुंभली पहाडी वरती वृक्षारोपण करण्यात आले.सोकोलीला लाभलेला निसर्गरम्य पहाड आपल्याला निसर्गाने दिलेला एक वरदान आहे, यामध्ये आणखी कशी भर पडेल आणि त्याची जोपासना करणे ही काळाची गरज आहे या किशोर बावणे फ्रीडम टॅलेंट अकॅडमीचे अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून हे वृक्षारोपण करण्यात आले. अकॅडमी तर्फे युवकांना प्रत्येकी १ झाड देऊन त्यांनी मैत्रिप्रमाणे झाडाची जोपासना करावी व त्याची निगा राखावी याची शपथ याप्रसंगी नेहरू युवा केंद्रातर्फे देण्यात आली.
यावेळी वनविभाग साकोलिचे क्षेत्रसहायक सुनील खांडेकर ,वनरक्षक संदीप भुसारी व मोहन खाटे. फ्रिडम टॅलेंट अकॅडमी चे अधेक्ष किशोर बावणे,नेहरू युवा केंद्र भंडारा तर्फे साकोली प्रतिनिधी त्रिवेणी गडपायले, प्रशांत घरडे, भूमिता घरडे यांनी विशेष योगदान दिले. याचप्रमाणे फ्रिडम टॅलेंट अकॅडमी चे सदस्य प्रवीण कांबळे, स्वामी निवारे, सागर पुस्तोडे,हेमंत चांदेवार, श्री पटले, कार्तिक लांजेवार,विशाल ठाकरे, लखन गोबाडे, टिकेश्वर वलथरे, सागर लांजेवार, यांनी वृक्षरोपकर्ता सहकार्य केले.