पवनी मध्ये सॅनिटायजेशन अभियानला सुरूवात
पवनी . भंडारा जिल्हयात कोरोणा नियंत्रणात्मक उपाययोजनांकरिता अभिग्यान फाऊं डेशन , स्टुडंट वेलफेअर असोशिएशन अंतर्गत संचालित COVID – 19 Household Disinfection and Sanitization Programe 2021 अभियानाला पवनी येथुन सुरुवात करण्यात आली . कोरोणाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता त्यावर आळा घालण्यासाठी सदर उपक्रम प्रत्येक जिल्हयात राबविण्यात येणार असुन त्याची सुरुवात पवनी शहरापासुन करण्यात आली . प्रत्येक घराघरांमध्ये जावुन लोकांमध्ये जन जागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे . दरम्यान अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी अध्यक्ष म्हणुन आरोग्य अधिकारी गुरुचरण ं नंदागवळी , तर प्रमुख उपस्थिती म्हणुन .जिल्हाध्यक्ष भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी ,मोहन पंचभाई उपजिल्हा प्रमुख शिवसेना. अनिल धकाते उपजिल्हा प्रमुख शिवसेना , नगरसेवक न.प.पवनी . गोपाल नंदरधने , डॉ . अश्विन मेश्राम , शैलेश तिवारी , उपस्थित होते . प्रास्ताविक अभिग्यान फाऊं डेशनचे अध्यक्ष प्रतिक लेपसे , तर संचलन देवेंद्र भिसीकर यांनी केले . आभार प्रदर्शन डॉ . कृष्णा कारू यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वैभव सावरबांधे , मृणाल कावळे , विनित तिमांडे , कवीत कावळे , मित्तल सोलंकी , सुरज गिरडकर , थांबदेव ढवळे व इव्हेंटट्रेंडी ची चमु उपस्थित होते .