विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. १२ सप्टेंबर :- उप वनसंरक्षक वन विभाग व वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय वन शहीद दिवसा निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उप वनसंरक्षक कार्यालयात नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप वनसंरक्षक एस बी भलावी होते. प्रमुख अतिथी म्हणुन प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी साकेत शेंडे, वन परिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर, सेवानिवृत्त वनाधिकारी तथा माजी अध्यक्ष वनरक्षक वनपाल संघटनेचे विजय मेहेर व वन अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.त्यावेळी शहीद वन कर्मचाऱ्यांच्या प्रतिमे समोर व्दीप प्रज्वलीत करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. नंतर उप वनसंरक्षक कार्यालयाच्या परिसरात शहीद वनरक्षक चंदन रामटेके, ब्रिजलाल रामटेके व वन मजुर उत्तम लंजे यांच्या स्मृतीप्रित्यार्थ वृक्षारोपण करण्यात आले.त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी शहीद वन दिनाचे महत्व व शहीद कर्मचाऱ्यांच्या जिवन चरिञ्यावर विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन एस एस कुकडे व प्रास्ताविक वन परिक्षेत्र अधिकारी विवेक राजूरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार एन श्रीरामे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आय एम सय्यद, अनिल शेळके, जयश्री राजगिरे, आर डी मेश्राम, बी एल डोरले, एस एस झंझाळ, डि एस तिरपुडे, नांगरगोजे, नंडगे, डुकरे, वन अधिकारी व कर्मचा-यांनी सहकार्य केले.