उमेश गोलेपल्लीवार
तालुका प्रतिनिधी सावली
सावली -,दि.28 सप्टेंबर:-
शेतकरी विरोधी कायदे रद्द करा,शेतीमालाला हमीभाव देण्याचा ( MSP)कायदा करा,विज विधेयक- 2020 मागे घ्या,खाजगीकरनातून उद्योगपतींचे हित जोपासणे बंद करा,पेट्रोल,डिझेल,गॅसची दरवाढ,महागाई,बेरोजगारी यामुळे भाजप शासित केंद्र सरकारने देश बरबाद केला या कृत्यांचा विरोध करीत आजच्या भारत बंद आंदोलनात तालुका काँग्रेसने समर्थन केला.केंद्र सरकारला देश विरोधी कार्यात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदार परिक्षीत पाटील यांच्या मार्फत पाठविण्यात आले.सोमवार 27 सप्टेंबर ला अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या वतीने भारत बंदचे आवाहन केले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला.काँग्रेस तालुका अध्यक्ष नितीन गोहणे यांच्या नेतृत्वात शहरातून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत तहसील कार्यालया पर्यत रॅली काढण्यात आली.यावेळी उपस्थित माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश पाटील चिटनुरवार.विजय मुत्यलवार प.समिती सभापती विजय भाऊ कोरेवार.नितीन दुवावार आणि काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.आंदोलनकर्त्यांनी व्यापारी प्रतिष्ठाने बंद करण्यासाठी व्यापाऱ्यांना आव्हान केले.मात्र स्थानिक पातळीवर या बंदला अल्प प्रतिसाद मिळाला.

