“पळसगाव(खुर्द) बौध्दसमाजाचा खुलासा”
राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी, नागभिड
नागभिड : तालुक्यातील पळसगाव (खुर्द) येथिल मिलिंद मेश्राम यांनी ‘माझे कुटुंबाला समाजातून बहिस्कृत केले’ असा आरोप करत मला न्याय देण्यात यावा असा कांगावा करत पोलिस महासचांलकाला तक्रार दिली व निवेदनाच्या प्रती एका पोर्टल च्या पत्रकाराला देवून वृत्त प्रकासीत करून समाजाची नाहक बदमानी करित आहेत.जे की बौद्धसमाजाचे कुठल्याही प्रकारे मेश्राम कुटुंबाला बहिस्कृत केले नाही असा खुलासा दि.27/10/2021 ला आयोजीत.सामाजीक सभेमधे केला. समाजाने खुलासा करतानां म्हटले कि , मिलिंद मेश्राम यांनी केलेले आरोप निराधार व निरर्धक असुन समाजाच्या कोणत्याही मिटिंग मधे मेश्राम कुटुंबाला बहिस्कृत केले आहे असा ठराव घेतलेला नाही.दरम्यान मिलिंद मेश्राम हे नेहमिच सामाजिक व समाजातील लोकाच्यां कार्यक्रमात उपस्थित राहतात तसेच त्याच्या पत्नी ह्या आशावर्कर असुन त्यांनाही त्याच्या कार्यात कोणताही अडतळा आलेला नाही. त्या नेहमिच समाजातिल कुटुंबात जावून आपले कार्य करित आहे. असे सर्व असतांनाही मिलिंद मेश्राम यांनी मझे कुटुंबाला समाजाने बहिस्कृत केले आहे.असा प्रकारे तक्रार करणे व तसी माहिती प्रसार माध्यमाला देणे उचित नाही व तेही समाजातील काही निवडक व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करून समाजिक वातावरण बिघडविण्याचे काम मिलिंद मेश्राम करित असल्याचा आरोप समाजबाधंवानी यावेळी केला. तसेच निवडनुकिच्या मुद्द्याला सामाजिक रगं देवून समाजाचे वातावरण गढुळ करण्याचा प्रयत्न करून समाजाचे तुकडे पाडण्याचे षठयत्र यामाध्यमातून सुरू केले जात आहेत मात्र असे कोणतेही कृत्य समाज खपवून घेणार नाही व यानतंर खोट्या तक्रारी देवून, व समाजाची बदनामी कारक वृत्त प्रसार माध्यमानां देवून समाजाची बदनामी करण्याचा मेश्राम यांचा प्रयत्न हानून पाडण्यात येईल व यानतंर असे कृत्य केल्यास समाजाचे वतिने अब्रुनुकासनिचा दाव टाकण्याचा इशारा समाजाचे वतिने देण्यात आला आहे.।