संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया.
नवेगावबांध : हाडांशी संबंधित आजारावरील निदान आणि उपचार निशुल्क शिबिर येथील युवराज कापगते यांच्या दवाखान्यात २९ ऑक्टोंबर रोज शुक्रवारला संपन्न झाले. परिसरातील हाडांशी संबंधित आजार असलेल्या १५० रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला. नागपूर येथील प्रसिद्ध अस्थितज्ञ डॉ.अभिनव केसरकर यांनी रुग्णांची तपासणी केली व सल्ला दिला. रुग्णांची हाडाची गणता मशीन(बीएमडी) द्वारे निशुल्क तपासणी देखील करण्यात आली.बीएमडी तंत्रज्ञ संदीप सिंग ठाकूर यांनी सेवा दिली.शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. युवराज कापगते, सामाजिक कार्यकर्ते अक्षय देशमुख, प्रियंका रोकडे, आशा नंदनवार यांनी सहकार्य केले.

