विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. ३१ ऑक्टोबर : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दक्षता जनजागृती सप्ताह 2021 अंतर्गत वकृत्व स्पर्धा व ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वकृत्व स्पर्धेचा विषय भ्रष्टाचार निर्मूलन देशाच्या प्रगतीसाठी आवश्यकव निबंध स्पर्धेचा विषय भ्रष्टाचार समाजाला लागलेली कीड या विषयांवर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी भ्रष्टाचार हे देशाच्या प्रगतीतील सर्वात मोठे आव्हान आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सक्षमपणे कार्य करत आहे असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक महेश चाटे, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा यांनी भ्रष्टाचार थांबविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे नमुद केले. भ्रष्टाचार थांबाविण्याची सुरुवात स्वतःपासून करावी असे मत मांडले.
वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक स्नेहा डोकरीमारे व द्वितीय क्रमांक बादल दमाहे यांनी पटकावला. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच
सहभागी सर्व स्पर्धकांना आकर्षक प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. वकृत्व स्पर्धेत एकूण 19 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.
डॉ. कार्तिक पनिकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना वकृत्व शैली विकसित करण्यासाठी काय करायला पाहिजे याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भोजराज श्रीरामे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. ममता राऊत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. उमेश बनसोड, डॉ. उज्वला वंजारी, प्रा. अजय देवकते, इन्स्पेक्टर कमलेश सोनटक्के
तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी व महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी तथा विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.