राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी,नागभिड
नागभिड (1नव्हे.) पाणी मागण्याचे उद्देशाने घरात शिरून महिलेवर अत्याचार केल्याची घटना उजेडात आली.असुन पिडितेच्या तक्रारीवरून रुपेश हरबाजी कुळमेथे (वय 32 वर्ष) रा.आवळगाव ता. ब्रम्हपूरी जि.चद्रंपूर यांचेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. रुपेश हा गावातीलच पिडितेच्या घरी पाणी मागण्याचे उद्देशाने गेला.पाणी दिल्यानतंर पिडिता कपडे धुण्यासाठी बाथरूम मधे गेली असता आरोपीने बाथरुम मधे प्रवेश करून पिडित महिलेच्या तोंडावर रुमाल बांधून तिचे हात मागे ओढले.व बळजबरीने अत्याचार केला.पिडित महिलेनी आरोपी विरुद्ध ब्रम्हपूरी पोलीस स्टेशन ला तक्रार दिली असता.आरोपी विरुद्ध भादंवि कलम ३७६,३७६(१),४५० अन्वये गुन्हा दाखल झाला असुन आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस १४ दिवसाची न्यायालयीण कोठळी सुनावली आहे.पुढील तपास पुलिस उपनिरिक्षक स्वाती फुलेकर करित आहेत.