उमेश गोलेपल्लीवार
तालुका प्रतिनिधी सावली
सावली- मागिल महिन्यात महाराष्ट्रातील विविध भागात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी व पुर्णतः हवालदील झालेला आहे त्यामुळे त्यांना न्याय मिळावा याकरिता भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अविनाश भाऊ पाल भारतीय जनता पक्षाचे महामंत्री सतिश भाऊ बोमावार यांच्या नेतृत्वाखाली सावली तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले व विविध मागण्यासाठी मा.तहसिलदार साहेब यांचे मार्फत मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन पाठविण्यात आले त्यावेळी उपस्थित भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश भाऊ पाल भारतीय जनता पक्षाचे महामंत्री सतिश भाऊ बोमावार संतोष भाऊ तंगडपल्लीवार जि.प.सदस्य भाजपा जेष्ठ नेते प्रकाश पा.गड्डमवार कविन्द्रंजी रोहनकार मोतीराम चिमुरकार गणपतजी कोठारे दिवाकर गेडाम विक्रांत चल्लावार नितीन टेपलवार अरविंद निकेसर उपस्थित होते.