विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. २१ नोहेंबर: जिल्हा सामान्य रूग्णालय व जिल्हा परिषद आरोग्य विभाग भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त असंसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक रियाज फारुकी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल ‘डोकरीमारे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी माथुरकर उपस्थित होते.
त्यावेळी दिवसेंदिवस देशात मधुमेह, उच्चरक्तदाब, कर्करोग वाढत आहे. या आजारावर मात करण्यासाठी व असे आजार होऊ नये, यासाठी योग्य व वेळेवर आहरासोबतच शारीरिक व्यायाम आवश्यक आहे. जनतेमध्ये अशा आजाराविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही सायकल रॅली जिल्हा परिषद भंडारा
येथून सुरू करण्यात आली. तर जिल्हा रुग्णालयात सांगता करण्यात आली.
सर्व सरकारी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्यवर्धिनी केंद्रात असंसर्गजन्य रोगांची तपासणी मोफत करून घेण्याचे आवाहन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल ‘डोकरीमारे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी माथुरकर यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी, आयएमएचे सदस्य, आयडीए सदस्य, निम सदस्य यांनी सहकार्य केले.