लक्ष्मी बाई केजरकर
विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. २२ नोव्हेंबर:- पवनी तालुक्यातील सेंद्रीय (खुर्द) येथील रहिवासी लक्ष्मीबाई झिंगर केजरकर यांचे वृद्धापकाळाने सोमवारला निधन झाले. मृत्यू समयी त्या १०७ वर्षाच्या होत्या. त्यांच्या मागे चार मुले, तीन मुली, सुना- नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार दि. २३ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता सेंद्री येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.