विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. २२ नोव्हेंबर : -१४ वी सबज्युनियर व १४ वी सिनियर राज्यस्तरीय नेटबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या भंडारा जिल्हा मुले-मुली संघाची निवड चाचणी मंगळवार दि. २३ नोव्हेंबरला दसरा मैदान स्टेशन रोड भंडारा येथे आयोजित केली आहे.
दिनांक २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान सबज्यूनिशर स्पर्धा (हिंगोली) तर सिनियर स्पर्धा दिनांक ३ ते ५ डिसेंबर पर्यंत जालना येथे सकाळी ६ ते ९ वाजता व ३ ते ६ या दोन संत्रात आयोजित करण्यात आली आहे. निवड चाचणी मध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची घोषणा लगेच करण्यात येणार आहे. येईल. सबज्युनियर गटात गटात (१६ वर्षापालील) दिनांक १ ऑगस्ट २००५ नंतर जन्मलेला खेळाडू पात्र राहणार आहे. वरिष्ठ गटासाठी वयाचे बंधन नाही.
तरी जिल्ह्यातील इच्छुक खेळाडूंनी २ पासपोर्ट फोटो, आधारकार्ड, बोनाफाईड प्रमाणपत्रासह दसरा मैनावर राष्ट्रीय खेळाडू सनी सोनेकर, मयुर पाल, विलास पराते, अंकित भगत, कु· साक्षी कटकवार (ऑल इंडिया नेटबॉल खेळाडू) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन भंडारा जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे सचिव श्याम देशमुख यांनी केले आहे.