विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. २२ नोव्हेंबर:- श्री सत्य साई सेवा समिती भंडाराच्या वतीने श्री सत्यसाईबाबा यांच्या ९६ जन्मदिना निमीत्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादरम्यान ग्रामसफाई, वृक्षारोपण, फळवाटप, अन्नदान, रक्तदान शिबीर घेण्यात आले.
कार्यक्रमाला श्री सत्य साई सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष धनराज माहुले, रविंद्र नागपुरे, यशवंत टिचकुले, रविशंकर साकोरे, भुषण बोकडे, वैभव सुर्यवंशी, नारायण उरकुडे, आनंद भुते, डोलारा मानकर, वासु चावरे, सतीश करंजेकर, विवेक मानकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
२३ नोव्हेंबरला श्री सत्यसाईबाबा यांच्या ९६ जन्मदिनानिमीत्य सत्य साई सेवा समिती तर्फे १७ ते २३ नोव्हेंबर पर्यंत विविध ठिकाणी ग्रामसफाई, भजन, गौरक्षण पुजा, वृक्षारोपण, फळवाटप, अन्नदान, रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्यात ३६ कार्यकत्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी करिता कृष्णा पवार, प्रमोद पवार, राम सोनवाने दायाराम इस्पात, शामराव ठोंबरे तसेच श्री सत्य साई सेवा समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.