विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दि. २३ नोव्हेंबर:- मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने इंदिरा गांधी वॉर्ड भंडारा येथे बालदिन नुकताच साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन नगर परिषद उपाध्यक्ष दिनेश भुरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी
चाईल्ड लाईनच्या समुपदेशक वैशाली सतदेवे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सुरेंद्र गायधने, पंकज पात्रे, डॉ. परिघ गजभिये, चाईल्ड लाईनचे प्रकल्प अधिकारी लोकप्रिया देशभरातर, सौ. ललिता लाडे, रेखा बोरसरे, नामदेव निपाने उपस्थित होते.
त्याप्रसंगी विद्यार्थी, पालक, वॉर्डातील प्रतिष्ठीत नागरिक यांच्या साहायाने जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीला वॉर्डातील पालक तसेच नागरिकांनी उत्तम सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
बालकांचे अधिकार, जगण्याचा हक्क, संरक्षण हक्क, विकासाचा हक्क, सहभागाचा हक्क, या चार मूलभूत हक्कांबद्दल अगदी सद्या आणि सोप्या भाषेत विद्यार्थाना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच चाईल्ड लाईन व 1098 बद्दलची माहिती देण्यात आली. व उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी, पालक , वॉर्डातील प्रतिष्ठीत नागरिकांना मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता
शाळा सहाय्यक अधिकारी कोमल चौधरी व समुदाय समन्वयक विद्या निपाणे तसेच विद्यार्थी, पालक , वॉर्डातील प्रतिष्ठित नागरिकांनी सहकार्य केले.