खेड : नाताळ सुट्टीसह नववर्षाच्या।स्वागतासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या ४ साप्ताहिक स्पेशल रेल्वेगाड्या १८ डिसेंबरपासून कोकण मार्गावर धावणार आहेत.
दादर-थिविम, थिविम-पनवेल, पुणे-करमाळी, करमाळी-पनवेल या गाड्यांचा समावेश आहे.
पूर्णपणे आरक्षित असणाऱ्या या स्पेशल गाड्यांच्या ४२ फेऱ्या धावणार असल्याने पर्यटक सुखावले आहेत.
०१२८७/०१२८८ क्रमांकाची दादर-थिविम साप्ताहिक स्पेशल
१८ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत दर बुधवारी व शनिवारी धावेल. दादर येथून रात्री १२ वाजून ३५ २० मिनिटांनी दादरला पोहोचेल. १७ डब्यांच्या स्पेशल गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्ड, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभवावाडी, कणकवली, सिंधुदुर्ग,
सावंतवाडी आदी थांबे आहेत.
०१२९०/०१२८९ क्रमांकाची थिविम-पनवेल आठवड्यातून ३
दिवस धावेल. १८ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत दर
बुधवारी, शनिवारी व रविवारी थिविम येथून दुपारी १.३० वाजता सुटून त्याचदिवशी रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दर गुरुवारी, रविवारी व सोमवारी रात्री १२ वाजून १५ मिनिटांनी सुटून त्याचदिवशी दुपारी १ वाजता थिविमला पोहोचेल. १७ डब्यांची ही गाडी सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर,
आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण, माणगाव, रोहा या स्थानकांवर थांबेल.
०१२९१/०१२९२ क्रमांकाची पुणे-करमाळी स्पेशल १७ ते ७ जानेवारीपर्यंत धावणार आहे. दर शुक्रवारी धावणारी स्पेशल पुणे येथून सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी सुटून दुसऱ्या
दिवशी सकाळी ६ वाजता करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात दर रविवारी करमाळी येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटून त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी पुणे येथे पोहोचेल. २२ डब्यांच्या या गाडीला लोणावळा,
कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ,सावंतवाडी, थिविम आदी स्थानकांवर थांबे आहेत.
०१२९४/०१२९३ क्रमांकाची करमाळी- पनवेल १८ डिसेंबर ते ८ जानेवारीपर्यंत दर शनिवारी धावेल. करमाळी येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटून त्याचदिवशी रात्री ८ वाजता पनवेलला पोहोचेल. पनवेल येथून शनिवारी रात्री १० वाजता सुटून सकाळी ६ वाजता करमाळीला पोहोचेल. २२ डब्यांची ही
गाडी थिविम, सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी, राजापूर, आडवली, रत्नागिरी, सावर्डे, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, स्थानकांवर थांबेल.
कोकण मार्गावर ३ नियमित गाड्यांना मुदत
कोकण मार्गावरून धावणाऱ्या मांडवी कोकणकन्या एक्सप्रेसपाठोपाठ आणखी नियमित गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली दिवा-रत्नागिरी, सावंतवाडी-मडगाव पॅसेंजर
दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसचा समावेश पूर्णपणे अनारक्षित ५०१०३/५०१०४ दि . रत्नागिरी व १०१०५/१०१०६ १० अनारक्षित तर ४ आरक्षित डबे असलेली दिवा सावंतवाडी नियमित एक्सप्रेस १ डिसेंबरपासून पुढील सूचनेपर्यंत धावेल. ५०१०७/५०१० सावंतवाडी-मडगाव नियमित पूर्णपणे अनारक्षित पॅसेंजरही पुढील सूचनेपर्यंत कायम धावणार आहे