विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी परंडा
परंडा : समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मुत्यु झाला आहे अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी अपघातातील एकाचे प्राण वाचवले या बाबत अधिक माहिती अशी की बिबीशन गीते वय २२आणि महादेव गीते वय २८ रा पागुंळगव्हाण ता आष्टी जि बीड हे खर्डा येथून आपल्या बहिणीला भेटून एम एच २३ आर ६१५६ ( एच एफ )डीलक्स गाडीवरून आपल्या पांगुंळगव्हान तालुका आष्टी जि बीड येथे जात शहरापासून तीन किलो मीटर अंतरावर मारूती मंदिरा जवळ समोरून एम एच १६ बी डब्ल्यू ३०८४ या मोटर सायकलची एकमेकांना धडक होऊन बिबीशन दादासाहेब गीते वय २२ याचा जागीच मृत्यू झाला आहे तर समोरच्या गाडी वरील दोघेही पसार झाले आहेत सदर घटनेची माहिती सागर नेटके यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना दिली असता ताबडतोब आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी कोठारी दाखल झाले यातील दोन्ही जखमींना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशांक शिंदे यांनी त्यांची तपासणी करून बिभीषण गीते यास मृत घोषित केले आहे.यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी जामखेड येथील पोलिस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना सदर माहिती दिली आहे पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानदेव भागवत , पोलीस कॉन्स्टेबल सतीश दळवी हे करत आहेत. अपघात ग्रस्तांना मदतीसाठी संजय कोठारी यांच्या सह सागर नेटके ,अरुण लटके, प्रवीण मंडलेचा , राहुल वास्कर, धनंजय काळे,महेश मोहोळकर ,महेश बांगर ,राजेश तांदळे , शेखर दळवी आदींनी मदत केली
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी म्हणाले जामखेड येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यास उशीर होतो त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी संख्या वाढवावी अशी मागणी केली आहे