

विजय शेवाळे
तालुका प्रतिनिधी परंडा

धनकवाडी प्रगतिशील शेतकरी साईनाथ भगवंत जाधव व अनिल भगवंत जाधव या दोघे भावंडांनी कांद्यामुळे हक्काचे घर मिळाले याची जाणीव ठेऊन घरावर चक्क 150 किलो कांद्याची प्रतिकृती उभारली आहे. आज जे घर झाले आहे ते केवळ कांदा पिकामुळेच असाच संदेश त्यांना यामधून द्यायचा आहे. घरावरील 150 कांदा आता येणाऱ्या-जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेऊन कांद्याची उतराई म्हणून घरावरच कांद्याची प्रतिकृती उभारली आहे.
लासलगाव दराबाबत कांदा हे पीक कीती लहरीपणाचे आहे हे आता नव्याने सांगण्याची गरज नाही. पण याच पिकामुळे जेव्हा घर उभा राहते तेव्हा काय घडते याचा प्रत्यय येवला तालुक्यातील धनकवाडी येथील (Farmer) शेतकरी बंधूंनी केलेल्या अनोख्या प्रयोगातून दाखवून दिले आहे. ऊसापाठोपाठ कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. उत्पादन वाढीच्या दृष्टीने हा कांदा लागवडीचा प्रयोग करतात. मात्र, दरातील लहरीपणामुळे कुणाचे साधते तर कुणाचे नुकसानही होते. ज्यांचा फायदा झाला आहे ते शेतकरी पुन्हा कसे उत्पादन वाढेल याचा धोरण आखतात. पण धनकवाडी प्रगतिशील शेतकरी साईनाथ भगवंत जाधव व अनिल भगवंत जाधव या दोघे भावंडांनी कांद्यामुळे हक्काचे घर मिळाले याची जाणीव ठेऊन घरावर चक्क 150 किलो कांद्याची प्रतिकृती उभारली आहे. आज जे घर झाले आहे ते केवळ कांदा पिकामुळेच असाच संदेश त्यांना यामधून द्यायचा आहे. घरावरील 150 कांदा आता येणाऱ्या-जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे. कांद्यासाठी प्रसिध्द असलेल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा अनोखा प्रयोग केल्यामुळे एक वेगळीच चर्चा रंगलेली आहे.
150 किलो वजन अन् 18 हजार रुपये खर्च..
हौशेला मोल नाही त्याप्रमाणे जाधव शेतकरी बंधूंनी आपली हौस पूर्ण करुन घेतली आहे. यासाठी त्यांना 18 हजार रुपये खर्च आला पण आपले घर जे उभे आहे ते केवळ कांद्यामुळेच याची जाणीव ठेवण्यासाठी त्यांनी हा अट्टाहास केला आहे. या प्रतिकृती असलेल्या कांद्याचे वजन हे 150 किलो आहे. हा कांदा महाकाय असल्याने दूरवरुन जाणाऱ्यांचेही लक्ष वेधून घेत आहे.


