- चित्तूर : आंध्र प्रदेशमधील (Andhra Pradesh) चित्तूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारुच्या नशेत इथे एका व्यक्तीने बकऱ्याचा बळी (Drunk Man Slaughters Human Instead of Goat) देण्याऐवजी एका माणसाचा बळी दिल्याची घटना १६ जानेवारीला घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोपीला अटक (Arrest) केली आहे. संक्रांतीच्या (Sankranti) उत्सवादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या बकऱ्यांचा बळी देण्याच्या कार्यक्रमादरम्यान मंदिराच्या बाजूलाच ही घटना घडल्याचं सांगितलं जातं आहे. मदनपल्ले (Madanpalle) गावामध्ये स्थानिक लोक मागील अनेक वर्षांपासून यल्लमा देवीच्या मंदिरामध्ये बकऱ्यांचा बळी देतात. चलापती नावाच्या एका व्यक्तीला मंदिरात बकऱ्याचा बळी द्यायचा होता. मात्र बकऱ्याचा बळी देण्यासाठी चलापति जेव्हा मंदिरात आला तेव्हा तो दारुच्या नशेत होते. पूजा झाल्यानंतर बळी देण्याची वेळ आली तेव्हा चलापतिने दारुच्या नशेत बकरा पकडून बसलेल्या सुरेश नावाच्या व्यक्तीच्याच गळ्यावर तलावर ठेवली. इतरांनी चलापतिला रोखण्याआधीच त्याने सुरेशच्या मानेवरुन तलवार फिरवली होती.दारुच्या नशेत असणाऱ्या चलापतिला स्थानिकांनी पकडून ठेवलं आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिलं.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.