राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी,नागभिड
नागभिड(30जाने.) जगाला प्रेम ,सेवाभाव व अहिंसेचे मार्ग दाखवणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त दि रूरल एज्युकेशन सोसायटी ब्रम्हपुरी सन 1960 द्वारा संचालित ‘लोक विद्यालय तळोधी(बा)’ येथे पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री.आर.बि विधाते साहेब यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, मानवता आणि अहिंसेलाच आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू मानून त्यांनी संपूर्ण आयुष्य देशासाठी नव्हेच तर अखिल मानवजातीसाठी व्यतीत केले. गांधीजी आणि त्यांचे विचार अजरामर आहेत.गांधीजींचे सत्य,अहिंसा, प्रेम, स्वच्छता, स्वावलंबन, स्वदेशी, भूतदया आणि मानवता याबाबतचे विचार आजही लागू होतात.यावेळी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक पि.यु.गिरडकर,पि.बी.पाकमोडे,आर. डी. हांडेकर, ए.एन. कोहळे,शिक्षक प्रतिनिधी संतोष नन्नावार,अजय सगळाम, कु.संगीता बालमवार,सोनल उंबरकर ,कविता नागपुरकर, एकनाथ भगत, संजय शेंडे, सुरेश कुंभरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार सहा. शिक्षक संतोष नन्नावार यांनी मानले.