विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा, दिनांक २१ फेब्रुवारी:- महाशिवरात्री च्या शुभ पर्वावर स्वामी ब्रम्हचैन्यजी यांच्या सह वैदिक धर्म संस्था, बेंगलुरु व आर्ट ऑफ लिविंग, भंडारा यांच्या वतीने सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ ला दुपारी ३ वाजता गुरू मंत्र दिक्षा तसेच सायंकाळी ६ वाजता सार्वजनिक रुद्रपुजा महाप्रसाद वितरण कार्यक्रमाचे आयोजन श्री समर्थ रामदासी मठ, नरकेसरी वॉर्ड, भंडारा येथे करण्यात आले आहे.
तरी रुद्र पूजा, गुरू मंत्र दिक्षा संकल्पा करिता जिल्ह्यातील नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन विद्या इंगोले, संगीता चौधरी, कविता देवगिरिकर, अर्चना नंदनवार, रजनी सोंकुसरे, कांचन हटवार, मनोज पुड़के तसेच समस्त आर्ट ऑफ लिविंग परिवार यांनी केले आहे.