भंडार्याच्या आधार शहर उपजीविका केंद्राचे केले कौतुक!
विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा : बचत गट व वस्ती स्तर संघ, शहर स्तर संघ आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे व संघाच्या माध्यमातून अभियानाची यशस्वी अंमलबाजावणी करावी व नागरिकांच्या अडचणींची सोडवणूक करावी, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजनेअंतर्गत महिला बचत गटांना प्रती सदस्य ४०,००० रुपये प्रमाणे स्टार्टअप रक्कम बीज भांडवलाच्या स्वरुपात खाद्य उद्योग उभारणीसाठी शासनामार्फत वस्ती स्तर संघ, शहर स्तर संघातून उपलब्ध होणार आहे. त्या माध्यमातून भंडारा शहरात अनेक उद्योग, व्यवसायाला चालना मिळेल. वस्ती स्तर संघ, शहर स्तर संघ अशा या संस्थेला विविध उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होऊन विविध उद्योगातून रोजगार मिळणार असल्याचे प्रतिपादन नगर परिषद प्रशासन मुंबई, संचालनालयाचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी केले. ते दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद भंडारा अंतर्गत सुरू असलेल्या सोनचिरैया आधार शहर उपजीविका केंद्राच्या उत्कृष्ट कामकाजाची दखल घेत केंद्राच्या कामाची पाहणी व आढावा बैठकीत बोलत होते.यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी विनोद जाधव, जिल्हा प्रशासन अधिकारी चंदन पाटील, राज्य अभियान व्यवस्थापक प्रसाद राजेभोसले, नीलेश डांगे, भंडाराचे प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पडोळे यांच्यासह नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील व्यवस्थापक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, समुदाय संघटक व शहर स्तर संघ व वस्ती स्तर संघाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उपायुक्त दोरकुळकर यांनी भंडाराच्या आधार शहर उपजीविका केंद्राचे शासन निर्देशानुसार यशस्वीरित्या शहर उपजीविका केंद्राचे कामकाज सुरू असल्याने समाधान व्यक्त केले. उपजीविका केंद्राच्या माध्यमातून शहरातील जनतेला विविध सुविधा बचत गटातील व व्यक्तीगत सदस्यांच्या उत्पादित वस्तूला बाजारपेठ उपलब्ध होत असून विविध सर्विस सेक्टरच्या सुविधातून महिला बचत गट व बेरोजगारांना आर्थिक बळ मिळात आहे. यामाध्यमातून महिला बचत गटांना विविध प्रशिक्षण देऊन शाश्वत रोजगार व आथिक बळ मिळत असल्याचे सांगितले. अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत नगर परिषद भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्हा व मनपा नागपूर जिल्ह्यातील सर्व नगर परिषदेचा भंडार नगर परिषद सभागृहात आढावा घेण्यात आला. यावेळी नागपुर विभागातील सर्व नगर परिषदेने या अभियानाची काटेकोरपने अंमलबजावणी करावी व अभियाना अंतर्गत विविध लाभांचे योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यास सांगितले. तर मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी भंडारा शहरात दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान प्रत्यक्ष समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत अमलबजावणी करत असल्याचे सांगितले. भंडारा शहरात अभियानांतर्गत महिला बचत गट, संघ बांधणी, कौशल्य प्रशिक्षण, व्यक्तीगत स्वयंरोजगार, पीएमस्वनिधी व महिला बचत गटांना अर्थ सहाय्य उपलब्ध केल्याचे सांगितले. आधार शहर उपजीविका केंद्राच्या माध्यमातून महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून झाली असून यापुढे महिला बचत गटकरिता महिला बचत गट भवन तयार करणार असल्याचे सांगितले. कोरोंना काळात महिला बचत गटांनी मास्क तयार करून कोविड-१९ जनजागृती केली. १०० टक्के लसीकरणासाठी महिला बचत गटांनी मोठे योगदान केले असल्याचे सांगितले. प्रकल्प व्यवस्थापक प्रविण पडोळे यांनी प्रास्ताविकातून नगर परिषद प्रशासन संचालनालयामार्फत घेण्यात येणारा आढावा बैठकीचे संचालन करीत भंडारा शहरात अभियानअंतर्गत सुरू असलेले कामाचा प्रगती अहवाल, स्वयंसहायता बचत गट व आधार शहर उपजीविका केंद्राची कामे, बचत गटाचे व्यवसाय, उद्योगांची क्षेत्र भेटीची माहिती दिली. यावेळी समुदाय संघटक उषा लांजेवर, रेखा आगलावे, सहाय्यक गुरुदास शेंडे, शहर स्तर संघाचे अध्यक्षा समिता भंडारी, भारती लिमजे, सरिता जांगळे, रंजना साखरकर, लिना ब्राम्हनकर, पंकज निमकर, संगीता बांते, शामीम बांनो, रंजना गौरी, सीमा साखरकर, कोमल सोंनटक्के, नीता टेभुर्णीकर तसेच भंडारा, गोंदिया, नागपूर जिल्ह्यातील सर्व शहर अभियान व्यवस्थापक, सहा. प्रकल्प अधिकारी, समुदाय संघटक उपस्थित होते.
“टिकाऊ वस्तूंची केली प्रशंसा…
महिला बचत गटाने टाकावू कागदापासून तयार केलेल्या बाहुल्या, हँडमेड आर्टिफिशियल ज्वेलरी, विविध कापडी बॅग, सिर्यमिक मूर्ती, शोभेच्या वस्तु, मातीची, कासा पितळीची भांडी, बांबू वस्तु, लाख बंगल्स, रुखवंताच्या वस्तु, बचत गटाने उत्पादित वस्तूंची पाहणी केली. टाकावू वस्तूंपासून तयार वस्तू पाहून प्रशंसा केली. बचत गट केवळ महिलांचे संघटनाचे माध्यम नसून आता महिलांच्या आर्थिक साक्षमीकरणाचे, यशस्वी उद्योजिका होण्याचे एक माध्यम बनल्याचे सांगितले त्यामुळे महिलांनी स्वता:चा छंद, कला गुण जोपासत नवनवीन वस्तु तयार करून उत्पादित वस्तूंची ई कॉमर्सवर आर्थिक उलाढाल करण्यास सांगितले. DAY- एनयूएलएम अभियानाच्या माध्यमातून वीर सावरकर वार्डातील बिरसामुंडा महिला बचत गटा अंतर्गत सुरू असलेल्या गृह उद्योग व राजगुरू वार्डातील जनशक्ती महिला बचत गटाच्या शोभिवंत वस्तु व्यवसायाची पाहणी केली. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषद भंडारा अंतर्गत सुरू असलेल्या आधार शहरी बेघर निवारा केंद्राला भेट देत उपलब्ध सुविधांची माहिती घेत बेघर व्यक्तींसोबत चर्चा केली.”