विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्य व विविध मागण्यांसाठी ” मानवी श्रुंखला आंदोलन ” सोमवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ ला, दुपारी १२ वाजता, गांधी पुतळा, व्हेरायटी चौक, नागपूर येथे घेण्यात येत आहे. मागण्या स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती केंद्र सरकारने तात्काळ करावी. २०० युनिट पर्यंत वीज फ्री करा, त्यानंतर चे दर निम्मे करा. महावितरण द्वारे वीज ग्राहकांचे जबरदस्तीने वीज कनेक्शन कापण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय त्वरित मागे घ्यावा. कृषी पंपाच्या वीज बिलातून शेतकऱ्यांना मुक्त करा. विदर्भातील उद्योगाचे ऊर्जा विभागाने १२०० कोटी रुपयांची सबसिडी तत्काळ वितरित करावी. अमरावती येथील मेडिकल कॉलेज ला त्वरित निधी देऊन काम शुरु करा, निधी पळविल्याचा निषेध, अमरावती येथील लघु उद्योग विकास महामंडळाचे कार्यालय बंद करण्याच्या निर्णय तत्काळ मागे घ्यावा. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी मानवी श्रुंखला” आंदोलनात हजारो च्या संख्येने सामील होण्याचे आवाहन माजी आमदार/अध्यक्ष विराआस ऍड. वामनराव चटप, देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, विदर्भ प्रदेश महिला आघाडी अध्यक्षा रंजनाताई मामर्डे, विदर्भ प्रदेश युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, देविदास लांजेवार तसेच विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकारी यांनी केले आहे.