विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने मंगळवारी तालुका क्रीडा अधिकाऱ्याचा पदोन्नती आदेश जाहीर केला. नागपूर जिल्हाला जिल्हा क्रीडा अधिकारी पद मिळाले आहे. इगतपुरी ( जि. नाशिक ) येथील तालुका क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांना पदोन्नती मिळून त्याना नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी पद मिळाले आहे. हिंगणा तालुका क्रीडा अधिकारी आशा मेश्राम यांना पदोन्नती मिळून त्या आता भंडारा जिल्हा क्रीडा अधिकारी झाल्या आहेत. २०१२ प्रथम तालुका गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून रुजू, २०१६ ला नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे तालुका क्रीडा अधिकारी, २०१९ ला हिंगणा येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून काम केल्यानंतर २०२२ ला भंडारा येथे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे. जीवनापासूनच त्या फुटबॉल पटू म्हणून प्रकाश झोतात आल्या होत्या. महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ पी सी अलेक्झांडर यांच्या हस्ते त्यांना सन ९६-९७ ला महाराष्ट्र सरकारचा महिला फुटबॉल या खेळात सर्वोच्च क्रीडा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता. आशा मेश्राम यांचे वडील पी टी मेश्राम हे नागपुरातील पहिला ऑर्किस्ट्र ‘शशी झंकार’ चे संस्थापक होते. हरहुन्नरी कलावंत म्हणून वडील सुप्रसिद्ध होते. कलावंत कुटुंबातून आशा मेश्राम आल्या आहेत. आशा, क्रीडा विषयक कार्यात फार प्रामाणिक आहेत. आशा मेश्राम यांची भंडारा जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. उल्लेखनीय म्हणजे आशा मेश्राम या महिला फुटबॉल पटू म्हणून सुपरिचित आहेत.