विलास केजरकर जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा : काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या निर्देशानुसार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी गणेशपुर येथील सामाजिक कार्यकर्ते पवन मस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पवन मस्के हे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस पक्षाचा प्रामाणिकपणे कार्य करत आहेत. काँग्रेस कमीटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या मार्गदर्शनात ते काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी नेहमी प्रामाणिक कार्य करत आले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी गणेशपुर, दवडीपार, बेला यासह परिसरातील अनेक गावांमध्ये नागरिकांकरिता उल्लेखनीय कार्य केलेले आहेत. शेतकऱ्यांच्या, गोरगरिबांच्या व गोसेखुर्द प्रकल्पबाधित नागरिकांच्या समस्या त्यांनी शासन दरबारी मांडून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. तसेच नगर परिषद भंडारा हद्दीतील अनेक समस्यांना घेऊन पवन मस्के हे वेळोवेळी पाठपुरावा करत असतात. या कार्याची दखल घेत काँग्रेस कमिटी तर्फे पवन मस्के यांची भंडारा जिल्हा सचिव पदी मंगळवारी भंडारा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पवन मस्के यांना नियुक्ती पत्र काँग्रेस कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई,
राजू पालीवाल, जिया पटेल कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश महासचिव, शिशिर वंजारी सचिव कॉंग्रेस महाराष्ट्र प्रदेश, ,
अवेश पटेल, सदाशिव धारगावे, आकाश कोरे, माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, पवन वंजारी, विनीत देशपांडे व अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
पवन मस्के यांनी आपल्या निवडीचे श्रेय काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांना दिले आहे.
पवन मस्के यांच्या नियुक्तीनंतर भंडारा जिल्ह्यातून सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.