राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी,नागभिड
नागभीड : तालुक्यातील नवेगांव (पांडव) येथील शेतकऱ्याने मिंथुर या गावातील शेतात मोहफुलाचे झाडाला गळफास लावुन आत्महत्या केली आहे.मृत्तकाचे नाव देवराव सुरस्कर असुन (वय ५५वर्ष) ही घटना आज सकाळी ८ ते ९ च्या दरम्यान दिसुन आली. मृतकाला पत्नी आणी दोन मुले आहेत. वृत्त लिहेपर्यत मृत्यूचे कारण कळु शकले नाही. अधिक तपास नागभिड पोलीस करीत आहेत.