राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी नागभिड
नागभिड : आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था गोविंदपुर र. न. ११०३, संपन्न झालेल्या निवडणुकीत शेतकरी युवा परिवर्तन पॅनल एकतर्फी विजय झाला असुन आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था गोविंदपुर चे.अध्यक्ष पदी शेतकरी युवा परिवर्तन पॅनल चे मारोती ऊईके तर उपाध्यक्ष पदी ज्ञानदेव काशिनाथ हांडेकर यांची अविरोध निवड क़रण्यात आली प्रसंगी सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचे काँग्रेस कार्यकर्ता दिवाकर निकुरे , सरपंच अमोल बावनकर येणोली, प्रमोद गायकवाड माजी सरपंच सोनुली, वैभव निकुरे उपसरपंच मांगरुड , नितीन भाऊ कटारे,अनिल बिरेवार, अमजद भाऊ शेख, चेकु पा. हांडेकर, श्रावण ठोंबरे, विलास गहाणे यांनी पुष्प हार घालून स्वागत केले.