

राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी,नागभिड

नागभिड: चिखल परसोडी येथे घरी लग्न असल्यामुळे लग्न करिता चा सामान आणायला नागभीडला जाणार्या युवकांच्या दुचाकीला – टिप्परने धडक दिल्यामुळे एकाच परिवारातील दोन युवक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सविस्तर वृत्त, घरच्या लग्नाचे कार्य असल्यामुळे लग्नाच्या कामाकरता नागभीड येथे खरेदी करायला गाव चिखल परसोडी वरून नागभीडला मोटारसायकल क्रमांक एम. एच. 31 बी.आर.17 47 ने जात असताना या मोटरसायकल ला, नागभीड कडून ब्रम्हपुरी कडे जाणाऱ्या मालवाहू टिप्पर क्रमांक एम. एच. 40 बी.जी. 54 41 ने समोरासमोर जोरदार धडक दिल्यामुळे भूषण शामराव बोकडे, वय 25 वर्ष, पवन विनोद बोकडे वय 17 वर्ष, हे दोन युवक जागीच ठार झाले . तर गिरीश सुधाकर बोकडे वय 18 वर्ष हा गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्याला ग्रामीण रुग्णालय येथे नागभीड येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्याला तात्काळ नागपूरला समोरील उपचाराकरिता हलविण्यात आले. चालक अपघात स्थळी टिप्पर ठेवून फरार झाला. पंचनामा करून दोन्ही शव विच्छेदन करिता ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे आनन्यात आले. समोरील तपास नागभीड पोलिस हे करीत आहे. या अपघातामुळे चिखल परसोडी व परिसरात शोककळा पसरली असून परिवारातील संध्याकाळचा असलेला लग्न समारंभ हा शोक समारंभात बदलला आहे.


