विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा :- जवळच्या गणेशपुर येथील सामाजिक कार्यकर्ते सागर सुभाष भुरे यांचे आज नागपूर येथे अपघातात निधन झाले. मृत्यू समयी ते ३० वर्षांचे होते.
त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी व तीन वर्षाची एक मुलगी आहे. तसेच बराच मोठा आप्त आहे. ते जिल्हा परिषद येथील एन आर एल एम मध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून कार्यरत होते.
त्यांच्या पार्थिवावर भंडारा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते संस्कार चळवळ, गांधी विचार मंच व पतंजली योग समितीचे जिल्हा मिडिया प्रभारी तसेच विविध सामाजिक संस्थेशी जुळलेले होते. त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
विविध सामाजिक संस्थांचे आधार स्तंभ हरवले आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. त्यामुळे अनेकांना खूप मोठा झटका बसलेला आहे. सागर भुरे यांना संस्कार चळवळ, गांधी विचार मंच व पतंजलि योग समिती तसेच विविध सामाजिक संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

