बेटाळा येथील बालसंस्कार शिबीराचा समारोप
विलास केजरकर, जिल्हा प्रतिनिधी भंडारा.
भंडारा:- विद्यार्थी हा कोऱ्या पाटी सारखा आहे. पाटीवर चांगले लिहिले तर ती पाटी इतरांना मार्गदर्शक ठरत असते. त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार केले तर त्याचे इतर विद्यार्थी अनुकरण करणार. त्याकरिता परिसर व घरातील वातावरण चांगले असायला हवे. मात्र विद्यार्थ्यांकडून वाईट गोष्टींचा उल्लेख झाल्यावर विनाकारण आपण शिक्षकांना दोष देत असतो. परंतु कोणत्याही शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावेत असे वाटते. म्हणून सर्व पालकांनी शिक्षकांना योग्य सहकार्य करावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खराशीचे मुख्याध्यापक सय्यद मुबारक यांनी केले.
ते जिल्हा परिषद माध्यमिक शाळा बेटाळाच्या प्रांगणात कृतिशील युवा.. प्रगतीशील देश.., ग्रामिण विकास संघटना बेटाळाच्या वतीने पाच दिवशीय निःशुल्क बाल संस्कार व शैक्षणिक तसेच क्रिडा मार्गदर्शन शिबिरात बोलत होते.
बाल संस्कार शिबिराचे समारोप व पालकांकरिता मार्गदर्शन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम विद्यालयाचे सेवा निवृत्त मुख्याध्यापक एस. एस. गाडेकर होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खराशीचे मुख्याध्यापक सय्यद मुबारक, आंधळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मंथानी, बेटाळा येथील सरपंच रामसिंग बैस, तुमसर येथील से.नि. मुख्याध्यापक वाघमारे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक विनायक मोथारकर, सेवा निवृत्त मुख्याध्यापक यशवंत बिरे, संस्कार शिबिर ग्रामिणचे प्रमुख विलास केजरकर, एम. एम. कानेकर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, माॅ. जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
त्यावेळी ग्रामीण विकास संघटनेचे ब्रीदवाक्य असलेल्या “क्रांती नव्या बदलाची… बदल नव्या अध्यायाचा.. अध्याय तुम्हा – आम्हा सर्वांचा.. या वाक्याप्रमाणे शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक भान लक्षात ठेवून विद्यार्थी व युवकांना मार्गदर्शन व पालकांचे समुपदेशन तसेच विविध मान्यवरांनी बाल संस्कार शिबिरात संगीतमय योगासने, प्राणायम, बालकथा व गोष्टी, हसत खेळत, टाकाऊतून टिकाऊ, शैक्षणिक व क्रिडा अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
पाच दिवशीय बाल संस्कार शिबिरात विविध उपक्रम घेण्यात आले. त्यात ग्रामीण विकास संघटनेच्या वतीने जानेवारी- २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत कु. प्राची प्रमोद ईश्वरकर, कु. अंकिता श्रीकृष्ण गिदमारे, कु. हंसिका नरेंद्र वानखेडे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच शिबिरामध्ये घेण्यात आलेल्या योगासने स्पर्धेत सागर चौधरी, उठा बसी स्पर्धेत छंनू बागडे, गणितीय जादू या स्पर्धेत संगम समरीत, रुद्रा डोरले तसेच उत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून विद्यार्थी केतन नरेश अतकरी व कु. श्रुती प्रमोद ईश्वरकर यांना स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच शिबिरात सहभागी असणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिष्णा कानेटकर व प्रास्ताविक संघटनेचे संचालक कार्तिक डोरले यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार वासुदेव कुंभलकर यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संचालक कार्तिक डोरले, क्रिष्णा कमाने, महेंद्र राऊत, आमिर शेख, वासुदेव कुंभलकर, अविनाश राऊत, श्रीकांत ढेंगे, अमिर शेख, सुभाष नंदुरकर, प्रशांत बोरकर, वैभव लिल्हारे, क्रिष्णा कानेटकर, राजेश बनकर, राजेश उरकुडे, विलास डोरले, लखन ईश्वरकर, कुणाल मते, तनोज मलेवार, आशिष मेश्राम, सुरज बनकर, सीमा कांबळे तसेच जि. प. शाळेतील मुख्याध्यापक विनायक मोथारकर, वेणुताई नाकतोडे, मोहन भेंडारकर, जनार्दन भुरे, शिवशंकर झंजाडे, शोभाराम गभणे, अनिल भालेराव्, वैशाली धरमसारे, उज्वला टिचकुले, पुष्पा मोथारकर, रश्मी लांजेवार व ग्रामिण विकास संघटना, बाल संस्कार शिबिरार्थी तसेच ग्रामवासियांनी सहकार्य केले.
