संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
नवेगावबांध : गोंदिया – बल्लारशा रेल्वेमार्गावर अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव रेल्वे – अरुणनगर रेल्वे रोडवर कोरंबी कंपार्टमेंट क्रमांक 260 ( राखीव वन ) या घनदाट जंगलात दहा जूनच्या रात्रौ रेल्वेच्या धडकेत पट्टेदार वाघ ठार झाल्याची घटना 11 जून च्या सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली.याबाबत सविस्तर वृत्त असे की अर्जुनी मोरगाव तालुका हा घनदाट जंगल व्याप्त आहे .या तालुक्यात जंगली हिंस्त्र जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पट्टेदार वाघासह बिबट ,अस्वल ,व अन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. अर्जुनी मोरगाव तालुक्यातून गोंदिया -बल्लारशा रेल्वे मार्ग आहे. या रेल्वे मार्गावर दहा जूनच्या रात्रौ रेल्वेच्या धडकेने पट्टेदार वाघ ठार झाल्याची माहिती अरुणनगर रेल्वे स्टेशनचे कर्मचारी गोविंदप्रसाद यांनी 11 जून ला सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. लगेच अर्जुनी-मोर चे वनपरिक्षेत्राधिकारी एस.डी. खोबरागडे, वडेगाव चे क्षेत्र सहाय्यक डब्ल्यू. एम. वेलतुरे, तसेच कोरंभि च्या सरपंच संगीता नाकाडे यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली .त्या ठिकाणी रेल्वे रुळाच्या बाजूला पट्टेदार वाघ मृतावस्थेत दिसून आला. लगेच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी यांना कळविले असता गोंदिया वन विभागाचे उपवनसंरक्षक कुलराजसिंग, नवेगावबांध चे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी डी. व्ही. राऊत, गोंदियाचे मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक विजय भालेकर व अन्य अधिकारी व कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर मृत्त वाघाचा पंचनामा करण्यात आला. अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील सह वनक्षेत्र वडेगाव ,नियतक्षेत्र कोरंबी कक्ष क्रमांक 260 राखीव वन कोरंबी ते चारभट्टी डांबर रोड परिसरातील गोंदिया बल्लारशा दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रुळा लगत पट्टेदार वाघ रेल्वेच्या धडकेने रेल्वे रुळाच्या बाजूला मृतावस्थेत पडुन दिसला. सदर पट्टेदार वाघ हा सहा ते सात वर्ष वयाचा असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रेल्वेच्या धडकेत सदर वाघाची कमर व डावा पाय मोडलेला दिसून आला. असून वाघाचे शरीराचे सर्व अवयव सुरक्षित असल्याचे वन विभागाचे कर्मचाऱ्यांनी सांगितले मृत्त वाघाचे घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले व घटनास्थळा च्या बाजूला सदर वाघाचा मृतदेह जाळण्यात आला.