विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणूकीत देशाचे लाडले व भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विकास पुरुष खासदार प्रफुल्ल पटेल यांची पाचव्यांदा राज्यसभेत निवडून आल्याबद्दल भंडारा येथील नागरी सत्कार समिती व विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना तसेच पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १२ जून २०२२ ला दुपारी ३ वाजता नागपूर रोड, भंडारा येथील हेमंत सेलीब्रेशन हाल येथे भव्य नागरी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध राजनितीक पक्ष, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना व पत्रकार बंधुंनी जास्तीत -जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नागरी सत्कार समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले आहे.