राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी नागभिड
नागभिड : जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर आणि प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन संयुक्त विद्यमाने सुटीतील शैक्षणिक उपक्रम राबवण्याबाबत मे महिन्याच्या सुरुवातीला जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मिताली शेट्टी मॅडम यांच्या मार्गदर्शनात नियोजन करण्यात आले आहे.गावातील युवक युवतीच्या सहकाऱ्याने खेळाच्या माध्यमातून विद्यार्थांच्या भाषा आणि गणित विषयाच्या मुलभूत क्षमता पूर्ण होण्यास मदत होणार आहे. गावातील स्वयंसेवकांच्या मदतीने जिल्हाभरात उन्हाळी शिबीर राबविण्यात आले.यावेळी स्वयंसेकांनी शिबीरांमध्ये उत्स्फुर्त सहभाग घेतला.चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षणदान व शाळापूर्व तयारी कार्यक्रम राबवीत आहेत त्या मध्ये सहभागी स्वयंसेवकाच्या मदतीने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान वर आधारित कृती घेतल्यास विद्यार्थ्यांना मदत होऊन पुढील शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसी मुलांच्या अध्ययनस्तरात वाढ होईल. तालुक्यातील 120 गावामध्ये 200 स्वयंसेवकांनी उत्फूर्त सहभाग नोंदविला आहे. प्रथम संस्थेमार्फत सर्व स्वयंसेवकांची नोंदणी केली गेली.स्वयंसेवकांना प्रशिक्षित करून तालुका आणि केंद्र स्तरावर शैक्षणिक साहित्य देण्यात आले.तसेच स्वयंसेवकांच्या मदतीने उन्हाळी शिबीर सुरु झाले आहेत. सदर शिबिरात खेळ,गाणी, गप्पा आणि गोष्ठी इत्यादी कृती घेण्यात येत आहेत.या अभियानात सहभागी स्वयं सेवकांना डिजिटल रेडिनेस कोर्स देण्यात येत आहेत. सदर शिबिर यशस्वी कण्यासाठी मा.गटशिक्षणाधिकारी नाट साहेब पंचायत समिती चिमूर,साधन व्यक्ती केन्द्र प्रमुख,मुख्यघ्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका सरपंच, smc समिती आणि प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन सर्व प्रतिनिधी पुढाकार घेत आहेत.