पवनी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक व मंडळामार्फत घेण्यात आलेल्या मार्च 2022 बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये वैनगंगा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाने 15वर्षापासून शंभर टक्के परंपरा राखत पवनी तालुक्यातून प्रथम येण्याचा मान कुमारी सुजल पूनराज वानखेडे हिने89.17%, कु दुर्गा कवडू शेंडे 79.69%, चेतन पितांबर गिरीपुंजे 77.17% गुणवत्ता प्राप्त आहेत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वैनगंगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर सचिव विनोद मेंढे प्राचार्या सुजाता अवचार उपप्राचार्य पराग टेंभेंकर पर्यवेक्षक अजय ठवरे तसेच प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.