प्रमोद बोपटे
जिल्हा प्रतिनिधी,अकोला
अकोला दि.19 सप्टेंबर :- जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , अकोलाचे वतीने ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयेाजन 20 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत करण्यात आलेले आहे.सदर मेळाव्यामध्ये नामांकित खाजगी उद्योजक / कंपनी / त्यांचे प्रतिनिधी 200 पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवतील.तसेच पात्र पुरुष व महिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल .कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या – www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नांव नोंदणी केलेल्या दहावी/ बारावी / पदवी / नर्सिंग पदवीका (ए.एन.एम./जी.एन.एम.) /आयटीआय पास / पदवीत्तर , पुरुष / महिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्ड चा वापर करुन ऑनलाईन आपले लॉगइन मधुन ऑनलाईन अर्ज ( Apply ) करुन यात सहभागी होऊन रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे . या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणा वरून आपल्या सेवायोजन ( एम्लॉयमेंट ) कार्डचा युझर आयडी व पासवर्ड चा वापर करुन आपल्या लॉगइन मधुन ऑनलाईन रोजगार मेळाव्यात आँनलाईन पद्धतीने सहभागी होऊ शकतात.पात्र असलेल्या पुरुष / महिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणीक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदांकरीता सुध्दा ऑनलाईन अर्ज ( Apply ) करु शकतात तरी 20 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर कालावधी दरम्यान आपल्या सेवायोजन कार्डच्या युझर आयडी आणि पासवर्डचा वापर करुन आपले लॉगइन मधुन ऑनलाईन अर्ज ( Apply ) करावे तसेच ऑनलाईन अर्ज ( Apply ) करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला .या कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा साधावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त श्रीमती प्रां.यो.बारस्कर यांनी केले आहे .