विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : टिळक वार्डात असलेल्या समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्युकेशन भंडाराच्या वतीने दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण संपादन करून पास झालेल्या तीन विद्यार्थिनींचा जाहीर सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला विदर्भ ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक सचिव विलास केजरकर, समीर वर्ल्ड कॉम्पुटर एज्युकेशनचे संचालक समीर नवाज, संचालिका फराह शेख, संगणक प्रशिक्षक हिमांशू तिरपुडे,आदींच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थिनीं मनतशा अहमद, अल्विनाज शेख व राहेमीन शिफा फैयाज अंसारी यांचा कॉलेज बॅग व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दहावी व बारावी परीक्षेचे प्रमाणे एम एस सी आय टी परीक्षेत शंभर टक्के निकाल देऊन उत्कृष्ट गुण संपादन करून पास व्हावे. त्याकरिता नेहमी संगणकाचा सराव व शंभर टक्के उपस्थिती ठेवणे गरजेचे आहे. तर प्रत्येक गुणवंत विद्यार्थ्यांच्या समीर वर्ल्ड काॅम्प्युटर एज्युकेशन कडून नेहमी सत्कार कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे कार्य समीर काॅम्प्युटर कडून होत असते असे मत विदर्भ ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक सचिव विलास केजरकर यांनी व्यक्त केले. तर मोहम्मद शरीफ शेख, मोहम्मद शाहनवाज शेख, तौसीफ शेख, रूमाना शेख यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. अशा प्रकारे निकालाची परंपरा कायम ठेवणार आणि नव-नवीन उपक्रम राबविणारं एकमेव समीर काॅम्प्युटर सेंटर आहे असे मत समीर नवाज यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार संचालिका फराह शेख यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अनाबिया समीर शेख, नासिर शेख, मिहीर सतदेवे, अरहम रिझवी, शिफा शहरी फैय्याज अंसारी, नेहा सोनवणे, तन्मय पाल, दिपेश शेंडे, निनाद धुडसे, रुझैन शेख, इशरत शेख, प्रांजली कुंभलकर, डॉली हेडाऊ, लसिका हेडाऊ, निकिता रगडे, लकी बागडे, हर्षदा शिवणकर, लतीशा नंदनवार, नेहा कुंभलकर, चवरे, विलास बोपचे, प्रणोती हजारे तसेच समीर काॅम्प्युटर सेंटर मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.