राहुल रामटेके
तालुका प्रतिनिधी नागमिड
नागभिड : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान “आझादी का अमृत महोत्सव” निमीत्ताने करोडपती”झेप” प्रभाग संघाचे वार्षिक अधिवेशन संपन्न झाले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान”आझादी का अमृत महोत्सव”निमीत्ताने शासनामार्फत नवनवीन कार्यक्रम राबवीण्यात येत आहेत झेप महिला प्रभाग संघ संस्था पारडी –बाळापुर प्रभाग सघं तालुका नागभीड यांची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली.सदर सभेला हजारोंच्या संखेने महिला उपस्तीत होत्या.सदर प्रभाग संघ हा जिल्ह्यातील पहिला प्रभाग संघ असून अभियानाचा सुरवात नागभीड तालुक्यात याच प्रभागापासून सुरवात करण्यात आली. अभियानाचा जास्तीत जास्त निधी व विविध योजना या प्रभागात राबविण्यात आलेल्या आहेत. या प्रभागातील काही संसाधन व्यक्ती तसेच काही उपजीविका सखी मास्टर ट्रेनर म्हणून काम बजावत आहेत. या प्रभागातील जास्तीत जास्त कर्ज प्रास्तव दर वर्षी जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा नवेगाव पांडव, बँक ऑफ इंडिया मिंडाळा या बँक ला जातात व बँक सुधा काही आडकाठी न आणता महिलांना मदत करते. याच प्रभाग संघाला करोडपती प्रभाग संघ म्हणून ओळखले जाते..वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान प्रभागसंघाचे लेखापुस्तक, आर्थिक विवरण पत्रक व लेखापरीक्षनाचे वाचन करण्यात आले. कृती अहवाल आणि पुढील आर्थिक वर्षा साठी वार्षिक कृती आराखडा आणि अंदाजपत्र वार्षिक अहवाल तयार करण्यात आला. झालेल्या प्रगतीचा आढावा व पुढील वर्षातील वाटचाल याबाबत चर्चा करण्यात आली. यासोबतच प्रभाग संघातील महिला त्यांची मुले – मुली यांनी विविध प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. सर्व महिलांणी अतिशय हर्ष उल्हासात कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महिलांसाठी रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष शशीकला भेंडारकर, अध्यक्ष,झेप महीला प्रभागसंघ, प्रमुख पाहुणे. प्रणाली खोचरे, गट विकास अधिकारी,पंचायत समिती, नागभीड, मोहीत नैताम,तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, नागभीड, अनिता बावनकर, सचिव झेप महीला प्रभागसंघ,.सारीका राऊत, कोषाध्यक्ष, झेप महीला प्रभागसंघ, अमिर खाँन,तालुका व्यवस्थापक, अमोल मोडक, तालुका व्यवस्थापक, गजानन गोहणे, ज्योती साळवे, शुभम देशमुख, दिपक गायकवाड, प्रभाग समन्वयक, किशोर मेश्राम, समुदाय कृषी व्यवस्थापक, इंद्रजीत टेकाम, नंदकीशोर डहारे, समुदाय मत्स्य व्यवस्थापक, शालु खोब्रागडे, जगदीश हजारे, समुदाय पशू व्यवस्थापक, स्वप्नील गिरडकर, कौशल्य समन्वयक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन महानंदा दडमल, समुह संसाधन व्यक्ती, सारीका राऊत, प्रास्ताविक अनिता बावनकर आभार प्रदर्शन रुपाली कोसे, समुह संसाधन व्यक्ती यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभागातील समूह संसाधन व्यक्ती, आरोग्य व पोषण सखी, कृषी सखी, पशु सखी, मत्स्य सखी, बँक सखी प्रभागातील ग्रामसंघ व प्रभागसंघ पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.