विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : पंतप्रधान मा. नरेन्द्रजी मोदी, भारत सरकार यांच्या अथक प्रयत्नातून संयुक्त राष्ट्र महासंघात २१ जून ला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा ठराव संमत झाला. यावर्षी सुध्दा २१ जूनला आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस घेत आहोत. योगा हा केवळ शारीरिक व्यायाम प्रकार नसून त्याचा मानसिकतेशीही संबंध आहे. मानसिक अवस्था सर्व आजारांचे मूळ कारण आहे. मन स्वस्थ असेल तर शरीरही उत्तम राहते. हायपर टेंशन, डिप्रेशन, अपचन, निद्रानाश, ब्लडप्रेशर, डायबिटीस, कर्करोग, अंग स्पाँडीलायटीस, सायटिका, लठ्ठपणा या सारख्या वर्कर आजारांपासून दूर राहता येऊ शकते. म्हणून योगा हा आजार पळवतो. शरीर निरोगी बनवतो. शरीराची उर्जा वाढवतो. जीवन आनंदी बनवतो, असा योगा आहे. म्हणुन योगा ही सुखी आरोग्याची गुरूकिल्ली असे प्रतिपादन खमारी येथील आरोग्य वर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सि. के वाहाने यांनी केले. ते जिल्हा परिषद आरोग्य विभाग व आरोग्य वर्धिनी केंद खमारीच्या वतीने आयोजित भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षा निमित्त जागतिक योगा दिवस कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते. कार्यक्रमाला आरोग्य वर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एल. खरकाटे (कुथे), डॉ. सि. के वाहाने,योग शिक्षक विलास केजरकर, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त शिक्षक राहुल मेश्राम, उपस्थित होते. यावेळी योग प्रशिक्षिक विलास केजरकर यांनी उपस्थित योग साधकांना शिथिलीकरण व्यायाम, ग्रिवा चालन, घुटना चालन, ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, अर्धउष्ट्रासन, उष्ट्रासन, शशकासन, वक्रासन, मकरासन, भुंजगासन, शलभासन, सेतूबंधासन, उत्थानपादासन, हलासन, पवनमुक्तासन, शवासन, कपालभाती, नाडीशोधन, शकली प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, ध्यान योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच आपल्या क्षमतेनुसार दररोज नियमित किमान तासभर योगा, प्राणायाम व आसने केल्याने मन प्रसन्न राहून दैनंदिन कामे करतांना नवी ऊर्जा मिळते. शरिर सुदृढ राहून विविध आजार व व्याधींपासून मुक्ती मिळते. त्यामुळे लहानांसह, तरुण व ज्येष्ठांनी निरंतर योगा करावे असे आवाहन योगा प्रशिक्षिक विलास केजरकर यांनी केले.तसेच उपस्थित मान्यवरांनी विविध प्रकारची मार्मिक उदाहरण देऊन योगाचे महत्त्व पटवून दिले.” स्वस्थ भारत ! मजबुत भारत; स्वच्छ भारत ! निरोगी भारत” व ” करा योग, रहा निरोग “अशा प्रकारे सामाजिक योग संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सोनाली उके, व्ही.आर. मेश्राम, एस. एस. निंबार्ते, भागवत कुंभरे, पायल मोहरकर, शोभा रामटेके, प्रिती कामडी, शशिकला मेश्राम, प्रशांत रेहपाडे, रिकेश्वरी रेहपाडे, विलास मेश्राम, सविता रेहपाडे, शिल्पा पडारे, ज्योत्सना सपाटे, भाऊराव मेश्राम, संकुतला तरारे, सहादेव शहारे, भोला बुजाडे, रिकेश्वरी रेहपाडे, संस्कृत केजरकर, निकेश पंचबुध्दे, श्रीधर देशमुख, बेबी शेंडे, प्रणोती नागपूरे, कशिश नागपूरे, निखिल, शिवाणी नागपूरे, छगन गजभिये, कमला समरित, पुरुषोत्तम बोरकर, सौरभ आग्रे, संजय बोरकर, दिक्षा बोरकर, प्रिया कुंभलवार, धनराज मेश्राम, वाय. वाय. हजारे व आरोग्य वर्धिनी केंद्रातील सर्व कर्मचारी व रुग्ण तसेच सर्व योग साधक, योग प्रेमी नागरिकांनी सहकार्य केले.