विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, पतंजलि योग परिवार, जे. एम. पटेल महाविद्यालय भंडारा, नेहरू युवा केंद्र, जे.एम. पटेल माजी विद्यार्थी संघटना, आर्ट ऑफ लिविंग, विश्व हिंदू परिषद, श्री सिद्धेश्वर योग निसर्गोपचार केंद्र व इतर सेवाभावी संस्थाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस जे. एम. पटेल महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती आशा मेश्राम, नेहरू युवा केंद्राचे अधिकारी श्री हितेंद्र वैद्य, भारत स्वाभिमान न्यास जिल्हा प्रभारी डॉ. रमेश खोबरागडे, पतंजली योग समिती जिल्हा प्रभारी रत्नाकर तिडके, महिला समिती जिल्हा प्रभारी कांचन ठाकरे, आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक कांचन हटवार, विश्व हिंदू परिषदचे प्रांत उपाध्यक्ष संजय एकापूरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश जाधव, विश्व हिंदू परिषद अध्यक्ष विजय पोहरकर, व्यापारी आघाडी संघटना अध्यक्ष मयूर बिसेन, ईश्वरलाल काबरा व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी डॉ. विकास ढोमणे यांनी शरीर स्वास्थ्यासाठी योगाचे अनन्य साधारण महत्व उपस्थितांना सांगितले. व आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पतंजलि योग समिती जिल्हा प्रभारी, रत्नाकर तिडके यांनी योग व योगाचे प्रकार या संबंधी तपशीलवार माहिती दिली. आयुष मंत्रालय भारत सरकारने निर्धारित केलेला सामान्य योग अभ्यासक्रमानुसार योग प्रशिक्षक, भारत स्वाभिमान न्यास जिल्हा प्रभारी डॉ. रमेश खोबरागडे व महिला पंतजलि योग समिती जिल्हा प्रभारी सौ. कांचन ठाकरे यांच्या मार्गदर्शनात योगासनांचा सराव घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून सतदेवे पॅथॉलॉजी लॅब, भंडारा यांच्या सहकार्याने उपस्थित सर्व योग प्रशिक्षणार्थींची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भोजराज श्रीरामे तर उपस्थितांचे आभार डॉ.बी.एस.पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉ. जितेंद्र किरसान, डॉ. रोमी बिष्ट, प्रा. प्रशांत वालदेव, डॉ. विना महाजन, नंदलाल बैस, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.कार्तिक पन्नीकर, विलास केजरकर, मोनिका इंगोले, प्रतिज्ञा टेंभरे, वैशाली गिऱ्हेपुंजे, शरद खरवडे, टि. एम. पारधी, वंदना खरवडे, कुमुदिनी हटवार, विद्या इंगोले, प्रसाद यशस्वी इंगोले, नेहरू युवा केंद्राचे रमेश अहिरकर, अतुल गेडाम, भोजराम चौधरी, वामन गोंधुळे, बिरदीचंद लाहोटी, विकास मदनकर, राहुल मेश्राम, संजोनी लांजेवार, प्राजक्ता वैदय, रुचिता बावनकर, मनिषा मारबते, सोहम मालखंडाळे, यश सोनवाने, चैतन्य मेश्राम, मोहीत वासनिक, प्राची उखरे, पुजा पाटसकर, दिपाली भजनकर, पायल गभणे, अनिकेत मडावी, राजेंद्र पिल्लारे व पतंजली योग समितीचे सदस्य, योग शिक्षक, नेहरू युवा केंद्राचे कर्मचारी, विश्व हिंदू परिषद,आर्ट ऑफ लिव्हींग, महाविद्यालयीन शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थी- विद्यार्थीनी भंडारा शहरातील नागरिक व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.