विलास केजरकर
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा : अखिल भारतीय किसान संघ जिल्हा शाखा भंडारा, विदर्भ प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगतशील शेतकरी सुभाष पांडे यांच्या शेतावर धानाची पेरणी करण्यापूर्वी बीज पूजन कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. भारतीय किसान संघ व विदर्भ प्रांत अध्यक्ष राजेश राणे, महामंत्री बाबुराव देशमुख, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीज पूजन कार्यक्रमाला पंतजलि योग समितीचे महामंत्री यशवंत बिरे, शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त राहुल मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते ए. आर. बोरकर, भारतीय किसान संघाचे प्रसिद्ध प्रमुख विलास केजरकर, प्रगतशील शेतकरी सुभाष पांडे उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धानाचे रोप (प-हे) घालण्यापूर्वी घरोघरी बीज पूजन करावे तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जैविक शेती व परिसरात आढळणाऱ्या जैवविविधतांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचे जतन करून लेखित स्वरूपात माहिती मिळवावी. विविध शासकीय योजनांची माहिती मिळविण्यासाठी वर्तमान पत्र वाचावे तसेच अधिकारी यांच्याशी संपर्क साधावे. पिक विम्यापासुन वंचित राहू नये. कारण शेतकरी वर्गाचा कोणीही कैवारी नाही म्हणून शेतकऱ्यांनी स्व:ताच्या शेतात पिकविलेले विविध प्रकारचे बि-बियाणे संशोधन स्वरूपात ठेवावे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते ए. आर. बोरकर यांनी केले. त्यावेळी जैविक शेती करणाऱ्यांनी विविध माहिती अवगत करावे. स्थानिक बियाणांचे संवर्धन व पर्यावरण पूरक शेती व्यवस्था करणे आवश्यक आहे. अनेक वर्षांपासून विदर्भात स्थानिक बियाणांच्या संवर्धनातून पर्यावरण पूरक व शाश्वत शेतीचे प्रयोग जैवविविधता संवर्धन, पर्यावरण संवर्धन व शाश्वत उपजीविकेचे काम करावे. प्रत्यक्ष काम करत असतांना स्थानिक बियाणांचे संवर्धन व पर्यावरण पूरक शेती करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन भारतीय किसान संघाचे प्रसिद्ध प्रमुख विलास केजरकर यांनी केले आहे.