महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती : शेगाव ग्रामपंचायत नेहमीच विविध समस्यांसाठी चर्चेत असलेली ग्रामपंचायत ठरली आहे. मग ती समस्या स्वच्छता, पाणी किंवा अतिक्रमण, रस्ते अशा विविध समस्यांनी नेहमीच चर्चेत असलेली आहे.शेगाव (बु) येथे दर सोमवारला आठवडी बाजार भरत असतो. किमान ५३ खेडे या बाजाराला जोडली गेली आहेत. आजूबाजूच्या खेड्यातील नागरिक आठवडी बाजाराला येत असल्यामुळे प्रचंड गर्दी होते. बाजारात भाजीपाला विक्रिनंतर उरलेला कचरा तसाच पडलेला असतो. बाजार संपल्यानंतर बाजाराची स्वच्छता ही व्यवस्थित केली जात नाही. आता पाऊसाळा सुरू झाला असून रोगराई पसरायला सुरुवात होते. त्यातच ग्रामपंचायत स्वच्छते कडे कुठलीच लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. वारंवार तक्रार करूनही त्यावर कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याचे आठवडी बाजारात बसणारे व्यावसायिक सांगतात. तसेच नागरिकांना नाकाला कपडे बांधून बाजार घ्यावा लागतो.

