संजीव बडोले
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
नवेगावबांध : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोरटोला /सावरटोला येथील युवा शेतकरी पवन मनोहर गुढेवार वय २८ रा.बोरटोला / सावरटोला स्वतः च्या शेतात काम करित असतांना दुपारी १.३० वाजेदरम्यान विज पडुन गंभीर जख्मी झाला, नवेगांवबांध ग्रामिण रुग्णालयात उपचारा दरम्यान मुत्यु त्याचा दुर्दैवी अंत झाला. सध्या परिसरात मृगनक्षत्राच्या सरी बरसल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात विविध कामे सुरू आहेत. त्यामुळे आकाशात अचानक ढग दाटून येतात व पावसाच्या सरी बरसतात. विजांचा कडकडाट होतो. कधीकधी निसर्गाचा कोप अनुभवायला येतो. आज दिनांक २३ जून ला निसर्गाने आपले असेच रौद्ररूप दाखवून,२८ वर्षीय युवकाला आपल्या कवेत घेतले. येथून जवळच ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोरटोला सावरटोला येथील शेतकरी मनोहर गुढेवार यांची घराच्या मागेच शेत जमीन आहे. सकाळी ११.० वाजेच्या सुमारास आई योगिताबाई गुढेवार,बहीणआशा गुढेवार सकाळी शेतामध्ये काम करायला गेले होत्या.१.०० वाजेच्या दरम्यान पवन आपल्या आई- बहिणीला शेतीच्या कामात मदत करायला शेतात गेला होता. शेतात काम करीत असताना दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान अचानक पवन च्या अंगावर वीज कोसळली.तो वीज पडून गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे तातडीने दाखल करण्यात आले. मनोहर व योगिता गुडेवार यांना पवन हा एकुलता एक मुलगा होता.पवनला काळाने असे ओढून नेले.आई योगिता हिने एकच हंबरडा फोडला.मनोहर यांचे अवसानच गळाले.२८ वर्षीय होतकरू पवन यांच्या मृत्यूने बोरटोल्यावर शोककळा पसरली.
काही दिवसापूर्वी पवनने सीआरपीएफ ची परीक्षा दिली होती. शारीरिक क्षमता परीक्षा उत्तीर्ण देखील झाला होता.आता फक्त त्याची वैद्यकीय परीक्षा बाकी होती. उद्या दि. २४ जूनला रेल्वे विभागाची परीक्षा द्यायला तो नागपूरला जाणार होता. परंतु दुर्दैवाने काळाने त्याच्यावर घाला घातला.
इकडे २.०० वाजेच्या दरम्यान उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. पवन हा अविवाहित होता. त्याच्या मागे आई-वडील व तिघ्या बहिणी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतकाचे प्रेत त्याच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले. उद्या सकाळी नऊ वाजता स्थानिक स्मशान घाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली असून, नवेगाव बांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अनंत तुलावी,पोलीस हवालदार साईनाथ नाकाडे,नापोशि मुकुंदा भुरे यांनी पंचनामा केला.नवेगावबांध पोलीस पुढील तपास करीत आहेत.