बबन हेमने
तालुका प्रतिनिधी साकोली
साकोली :- पावसाळा सुरू होताच वेगवेगळे रोग आपले डोकं वर काढत असतात व यांना वेळीच आळा घालणे आवश्यक असते. याच दृष्टीकोनातून फ्रिडम युथ फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे यांनी आज दि.०७ जुलै रोजी लेखी निवेदन देत नगरपरिषद साकोलीचे मुख्याधिकारी डाँ. कुलभूषण रामटेके यांच्याकडे मागणी केली. पावसाळा म्हणजे आजाराकरिता पोषण काळ, या दिवसात डासांचा उद्रेक वाढतो व त्यापासून मलेरिया तसेच डेंगूसारखे आजार बळावतात, यामुळे अनेकांना आपले जीव गमवावा लागतो.महत्वाचे म्हणजे पाणीसाठे,घाणीचे साम्राज्य असलेल्या ठिकाणी प्रतिबंधक उपाय म्हणून जंतूनाशक फवारणी व अन्य उपाययोजना वेळीच करणे गरजेचे असते,याकरता हे सदर निवेदन अध्यक्ष किशोर बावणे व सहका-यांनी स्वाक्षरीसह दिले. देतेवेळी फ्रिडम युथ फेडरेशनचे अध्यक्ष किशोर बावणे, सदस्य स्वप्निल गजभिये, असित बडोले, मयूर सोनवाने, गोविंद वानखेडे, प्रशांत भलावी, सचिन कुंभरे, रवि मेश्राम, अश्वेश खांडेकर, साहिल विनधानी, बबन हेमने, रोशण मारवाडे व अन्य सहकारी हजर होते.