शरण खन्ना
उपजिल्हा प्रतिनिधी
ठाणे
ठाणे दि १९ सप्टेंबर : गेल्या कित्येक वर्षांपासून सिद्धार्थ नगर,ठाणे पूर्व येथे महानगरपालिकाच्या माध्यमातून BSUP अंतर्गत बांधण्यात आलेल्या सदनिका (ईमारत) मध्ये गेली अनेक वर्षांपासून सिद्धार्थ नगर येथे वास्तव करीत असलेल्या कंजारभाट समाजातील ५० कुटुंबाना स्वतः चे घरकुल मिळून देण्यासाठी अनेक वर्ष स्थानिक नगरसेविका सौं. मालती रमाकांत पाटील तसेच समाजसेवक रमाकांत (दादा) पाटील यांनी वेळोवेळी ठा. म. पा चे आयुक्त तसेच BSUP चे अधिकारी यांच्याशी लिखित व संबंधित विषयावर चर्चा तसेच वेळोवेळी महासभेत वरील विषयाचे मुद्दे मांडून सिद्धार्थनगर येथील कंजारभाट समाजातील कुटुंबाना BSUP अंतर्गत बांधलेल्या इमारतीमध्ये स्वतः चे घर मिळाले त्यामुळे कंजारभाट समाजातील पंच कमिटी तसेच समाजातील जेष्ठांनी व तरुणांनी स्थानिक नगरसेविका सौं. मालती रमाकांत पाटील तसेच समाजसेवक रमाकांत (दादा) पाटील यांना गुलाब पुष्प देऊन व मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करून त्यांचे आभार मानले.

